CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
भुसावळ / वरणगांव : - (निलेश चौधरी यांजकडून ) :- किल्ले रायगडावर ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा पार पडला . यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अस्त्रः गुरुकुलम द्वारे स्थापित शिवसंकल्प शिवकालीन मर्दानी खेळ पथकाने शिवकालीन युद्धकलेचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकाली .
शिवराज्याभिषेक दिन सोहळयात देशातील विविध मर्दानी आखाड्यांना छत्रपती संभाजीराजे भोसले व महाराणी संयोगिता राजे भोसले यांनी सार्वजनिक शिवराज्याभिषेक समिती भारतच्या वतीने आखाड्यांना आमंत्रीत करण्यात आले होते.त्यामध्ये सर्वांनी आपली प्रात्याक्षिके सादर करता त्यात लाठी - काठी, दानपट्टा, तलावार बाजी, हरी ग ढ्ढा,परकाप, अशा शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
शिवसंकल्प शिवकालीन मर्दानी खेळ पथकाने शिवकालीन युद्धकलेचे प्रदर्शन केले. या पथकात गौरी फरकट, सायली गुजर, निधी दांडगे, हर्षदा सोनवणे, मंजिरी शेटे, क्राईम बॉर्डरच्या पत्रकार प्राजक्ता चौधरी, गणेश भुसारी, रितिक सपकाळ, श्रेयस भेकर, बालाजी नवले, विवेक शेळके,ओम राऊत, गोपाल तिवारी तर प्रशिक्षकांमध्ये संघ प्रमुख संभाजीराव हांडे, शिवा राऊत, व्यवस्थापक भुषण शिरसाट, गौरव रायलकर, सहाय्यक प्रशिक्षक जीवन सातव. यांनी अखंड परिश्रम घेत शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये शिवकालीन युद्ध कलेचे प्रदर्शन करून बुलढाणा जिल्ह्याचे नाव रायगडयाच्या पायरीवर कोरत पराक्रम गाजवला.