CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मालाड येथील प्रस्तावित शासकीय रुग्णालयाचे काम महिनाभरात सुरू करा - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:48 PM

मालाड येथील प्रस्तावित शासकीय रुग्णालयाचे काम महिनाभरात सुरू करा  - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई,: मालाड येथे शासकीय रुग्णालयाचे प्रस्तावित काम मुंबई महापालिकेने एका महिन्याच्या आत सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले

            पी, नॉथ वॉर्ड, मालाड (पश्चिम) येथे आज पार पडलेल्या 'पालकमंत्री आपल्या भेटीला' या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, राजहंस सिंग, नगरसेवक जयातिवाना, विनोद मिश्रा, गणेश खानकर यासह विभागाचे अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, सिटी सर्व्हे नंबर १९७ मध्ये प्रस्तावित शासकीस रूग्णालय होणार आहे, त्याबाबत मुंबई महापालिकेने तातडीने कार्यवाही करावी. मालाड येथील एम. एच. बी. कॉलनी येथे रेशनिंग दुकानामध्ये अनधिकृत धान्य विक्री होत असल्याच्या तक्रारीची चौकशी करून त्यावर तातडीने कारवाई करावी. मालाड परिसरात रोहिंगे यांची संख्या वाढत असून शासनाने यावर तोडगा काढावा या तक्रारीबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.

            यावेळी नागरिकांनी ४५२ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले. तर यामधील ९६ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या