CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
वरणगांव - ता . भुसावळ :--(निलेश चौधरी यांजकडून ) :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जंयतीनिमित्त वरणगांव शहरात विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते छत्रपती ग्रुप व जळगांव येथील शिवतांडव प्रतिष्ठान १३० जणाच्या वाद्य पथकाने तुफान जल्लोष करून शिवाजी महाराजांची जंयती साजरी करण्यात आली.
शिवजयंती महोत्सव समितीने भव्य दुचाकी रॅली काढली. छत्रपती ग्रुपतर्फे सकाळी ११.०० वा .तिरंगा सर्कल चौकात वरणगाव येथील क्राईम बॉर्डर च्या पत्रकार कु . प्राजक्ता चौधरी यांनी मर्दानी खेळ दाखवले. तसेच दुपारी ३.०० वा. शिवतांडव ढोलपथक यांनी तुफान जल्लोष करीत गावातून मिरवणूक काढली. व सांयकाळी मोठी होळी येथे माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज,शाहिस्तेखान, तानाजी मालसुरे, यसांजी कंक, मावळे इत्यादी सजीव देखावे सादर केले. व सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक विश्राम गृहापासून सुरु होते. ते तिरंगा सर्कल, भवानी मातेचा मंदिरजवळ किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पहार घालून अभिवंदन करण्यात येते. यावेळी शिवप्रेमीकडून दिलेल्या विविध घोषणांनी परिसर दणाणला होता. यावेळी विविध संघटनांनी एकत्र येवून शिवजयंती मिरवणूकीत सहभाग नोंदवला.
एपीआय भरत चौधरी, उप पो. नि. गणेश देशमुख, सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे, राहुल येवले, प्रशांत ठाकूर, पो.हे. को. मनोहर पाटील, होमगार्ड समादिशक संजय चौधरी, राम चौधरी आदि सह कर्मचार्यानी चोख बंदोबस्त ठेवला.
क्राईम बॉर्डर चे जळगाव जिल्हा प्रतिनिधी डॉ . शशिकांत काळे व निलेश चौधरी यांनी कु. प्राजक्ता चौधरी यांच्या मैदानी खेळ प्रात्यक्षिकासाठी विशेष परिश्रम घेतले .