CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
पारोळा - (निलेश चौधरी यांजकडून ) :- शहरात बालाजी रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला. सकाळी ११.०० वाजता मुख्य पुजारी संजय पाठक शास्त्री यांनी रथाची पूजा केली. संस्थेचे मुख्य विश्वस्त गिरीशशेठ शिंपी व त्यांच्या पत्नी सारिका शिंपी यांनी पारंपारिक पद्धतीने पूजा केली. दुपारी १२.०० वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली.
असे म्हटले आहे की, बालाजी महाराज देवस्थान हे ३५० वर्षापासून जागृत देवस्थान आहे. गिरीशशेठ शिंपी हे दरवर्षी बालाजी महाराजाच्या तिरुपतीला दर्शनासाठी पायी जात होते. पण एक वेळेस काही कारणावास्तव जावू शकले नाही. वय मानाने थकले तर साक्षात असं म्हटलं जातं बालाजी त्यांच्या झोळी मध्ये आले. म्हणून त्या दिवसापासून बालाजी संस्थांनला महत्त्व प्राप्त झालं आहे.साक्षात पारोळा शहरात त्यांच आगमन झालेल आहे. गिरीशशेठ शिंपी यांनी काही सन्माननीय मंडळींना बोलवून संस्था निर्माण केली.संस्थेने जवळ जवळ साडे पाच ते सहा कोटींच भव्य मंदिर उभारले. या मंदिरामधे अन्नछत्र आहे, स्वंयसेवक आहे, काही महिला मंडळ आहे. दरवर्षी एकादशीला रथोत्सव नवरात्रमध्ये साजरा होतो. कान्याकोपर्यातून भक्त महिला व माणंस येथे येत असतात. लाखो संस्थेने गर्दी असते . आठ ते नऊ दिवस वहन निघतात . शेवटचे दोन वहन रथोत्सवानंतर निघतात . ज्यावेळेस वहन सकाळी घरी येतात . त्याला विशिष्ठ आरती दिल्याशिवाय बालाजी जागेवरून उठत नाही .हा साक्षात्कार आहे.
यावेळी माजी मंत्री सतिश पाटील , माजी खासदार आणि बालाजी संस्थानचे विश्वस्त ए.टी.पाटील यांनी या रथाचे पूजन करून पहिली मोगरी लावली. नगराध्यक्ष करण पवार, नगरसेविका अंजली करण पवार - बाल कल्याण सभापती ,नगरसेवक पी. जी. पाटील ,अंजली करण पवार यांनी ५ ते ६ वर्षापासून जय जिजाऊ महिला मंडळ स्थापन केले. या मंडळामध्ये जवळ जवळ मुली ३०० आहे. या मुलींना लेझीम व लाठीकाठी पथकांनी प्रात्यक्षिक करून दाखविली . त्यांना बजरंग दल, राष्ट्रीय स्वंयसेवक , विश्व हिंद परिषद या संघानी मदत केली . राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे तालुकाप्रमुख सी. ए. मुकेश चोरडिया यांनी सहभाग घेतला.
पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला. पो. नि. सुनिल पवार, पो. नि. करण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल , गृहरक्षक दल, राखीव पोलीस दल, दामिनी पथक, पोलीस मित्र, शांतता समिती सदस्य यांनी चोख बंदोबस्त ठेवला.