CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
भुसावळ :- दिपनगरजवळ कपिल वस्तीजवळ दुचाकी व कारच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता ही घटना घडली. मयताचे नांव सुधाकर वानखेडे ( वय - ५६ ) रा. न्यू आंबेडकर नगर येथे राहत होता. अपघातांनतर महामार्गावरील वाहतूक काही काळ जाम झाली होती.
मयत सुधाकर वानखेडे हे संध्याकाळी ७ वाजता दुचाकीने ( एम एच. १९- ४६४९ ) या दुव्हीलने काम संपवून भुसावळकडे जात होते. वरणगांवकडे जात असलेली होंडा सिटी कार (एम एच . १९- बी यू . ७१३१) आणि दुचाकी याच्यांत अपघात झाला. यात सुधाकर वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला. होंडा सिटी कारमध्ये चालक सपकाळे व एक महिला होती. असे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी निरिक्षक तथा परिवेक्षाधीन डिवायएसपी सतिश कुळकर्णी व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत वानखेडे यांचा मृतदेह ट्रांमा केअर सेंटर येथे पाठविण्यात आला. डिवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी अपघाताची माहिती घेतली.