CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

विधी पाटील ची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड,रावेरचा मानाचा तुरा

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

रावेर : - येथील विधी पाटील या सातवीच्या विद्यार्थिनीने गोवा येथे नुकत्याच झालेल्या नॅशनल परफॉर्मिग आर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रंमाक मिळविला . आता तिची निवड नेपाळमध्ये जूनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली.

परफॉर्मिंग आर्ट्स असोशिएन ऑफ इंडिया आणि गोवा स्टेट परफॉर्मिंग आर्ट्स असोशिएन गोवा येथे संत सोबिरोनाथ आंबिये महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. यास्पर्धेसाठी जम्मू-काश्मिर, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, हिमाचल, दिल्ली, बंगाल, झारखंड , राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र , तामिलनाडू, केरळ, कर्नाटक येथील २२५ कालाकारांनी भाग घेतला होता.

गोव्याचे पर्यटन, आयटी मंत्री रोहन खौंते , नॅशनल परफॉर्मिंग आर्ट्स असोशिएनचे उपाध्यक्ष प्रकाश सिन्हा, नॅशनल सिंगिंग युनिटच्या अध्यक्षा सिमा अग्रवाल, टीम इंडियाच्या मॅनेजर गुरुविंदर कौर, बीएमसी ग्रुपच्या आरती माळी प्रमुख पाहुणे होते. विधी पाटील ही रावेर येथील रहिवासी आहे. ती बऱ्हाणपूर येथील अर्वाचीन इंडिया स्कूल या शाळेत शिकणाऱ्या विधी पाटील या चिमुरडया विद्यार्थिनी ने मध्यप्रदेशचे प्रतिनिधित्व करत असतांना प्रथम क्रंमाक व सुर्वण पदक मिळविले.

विधी पाटील ही ची निवड २६ व २७ जून रोजी त्रिभुवन विद्यापीठ, काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी तिची निवड करण्यात आली. ती पत्रकार व फोटोग्राफर प्रवीण पाटील यांची मुलगी आहे.