CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
निलेश चौधरी यांजकडून
वरणगांव :- येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला अपघात, पती ठार झाला असून पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. ५ रोजी सकाळच्या सुमारास १०:०० वाजता घडली .भुसावळ शहरातील नव महाराष्ट्र स्टोअर्स व टिप टॉप टिव्ही सेंटरचे संचालक ललीत प्रभाकर नेमाडे (४८) व निता ललीत नेमाडे ( ४२) हे दोघे पती, पत्नी शुक्रवार दि. ५ रोजी सकाळच्या सुमारास पौर्मिणा असल्याने चांगदेव येथील मंदिरात गेले होते . देव दर्शन आपोटून घरी भुसावळला आपल्या मोटार सायकलने क्र. एम एच १९ डी ३३५६ ने जात असतांना वरणगांव बायपास बाहेरून जाणाऱ्या उड्डाणपुलाजवळ अपघात झाला . अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या चेहर्याला गंभीर इजा झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे हे आपल्या सहकार्यांसह अपघात स्थळी दाखल झाले. .याबाबत वरणगांव पोलीस स्टेशनला जखमी निता ललीत नेमाडे यांच्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास उपनिरीक्षक किशोर पाटील हे करीत आहे .