CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
डोंबिवली :(क्राईम बॉर्डर टीम) : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या ध्येयाने प्रेरित होऊन क्राईम बॉर्डर (वृत्तपत्र व न्यूज पोर्टल) व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन तसेच आश्रय महिला संस्था गेल्या १४ वर्षापासून कार्य करीत आहे. सामाजिक व विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा विशेष सन्मान वरील संस्था व वृत्तपत्र करीत असते. उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या व नव्याने सामाजिक व राजकीय क्षेत्रात उतरलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचा सन्मान करून त्यांना प्रेरणा देण्याचे कार्य अव्यातपणे संस्थेतर्फे करण्यात येते.
सन २०२२/२३ वर्षातील समाजसेवा पुरस्कार २०२३ साठी उपरोक्त संस्थांच्या चमुने जळगाव जिल्ह्यातील आदर्शगाव असलेल्या राजवड च्या नवनियुक्त महिला सरपंच सौ. पुष्पलता नीलकंठ पाटील व महिला उपसरपंच सौ .रेखाताई प्रवीण पाटील यांची निवड केली.
आदर्शगावचे निवासी व कृषी भूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते नुकताच राजवड येथे उपरोक्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वखरे व आश्रय महिला संस्थेच्या संस्थापक तथा श्री स्वामी सखा (मासिकाच्या) संपादिका सौ.सीमाताई वखरे व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष राजवड येथे जाऊन महिला सरपंच सौ .पुष्पलता निळकंठ पाटील व , उपसरपंच सौ रेखाताई प्रवीण पाटील यांना समाजसेवा पुरस्कार २०२३ ने सन्मानित केले.
यावेळी कृषी भूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच ह्या दोन्ही महिला कार्यतत्पर असून त्या आदर्श गाव असलेल्या राजवड गावासाठी उत्तम प्रकारे कारभार करून गावाचे नाव उज्वल करतील असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना सरपंच सौ. पुष्पलता निळकंठ पाटील म्हणाल्या की गावातील महिला व मुलींसाठी तसेच गावकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना आम्ही राबवू.तसेच उपसरपंच सौ. रेखाताई पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना गावात महिला सबलीकरण तसेच गावातील युवक युवतींसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबवून मुलींच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येईल तसेच महिलांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात येण्यासाठी कृषिभूषण माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सरपंच उपसरपंच या नात्याने कार्य करू व त्यांचा वारसा आम्ही जपू. दादांनी आतापर्यंत राजवड गावासाठी व तालुक्यासाठी अनेक योजना राबवल्या गावाचे नाव मोठे केले तसेच गावच्या प्रथम नागरिक जिजामाता कृषी भूषण व अमळनेरच्या नगराध्यक्षा सौ.पुष्पलता साहेबराव पाटील ह्या आमच्या आदर्श असून आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून कार्य करू असे मनोगत त्यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
यावेळी सरपंच सौ. पुष्पलता नीलकंठ पाटील व उपसरपंच सौ. रेखाताई प्रवीण पाटील यांचा सत्कार कृषी भूषण व माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते व अमळनेरच्या नगराध्यक्ष जिजामाता कृषी भूषण पुष्पलता साहेबराव पाटील तसेच सौ .सीमा वखरे राजेंद्र वखरे निळकंठ पाटील प्रवीण पाटील व आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा छोटे खाणी पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.