CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

31 ऑक्टोबर पासून दक्षता जनजागृती सप्ताह

CRIME BORDER | 26 December 2025 | 03:51 PM

31 ऑक्टोबर पासून दक्षता जनजागृती सप्ताह

नवीमुंबई, :- दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त सोमवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.00 वाजता कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील बैठक कक्षात   भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी “भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा” घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी  दिली.

देशाच्या आर्थिक, सामाजिक तथा राजकीय प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा एक मोठा अडथळा आहे. या भ्रष्टाचारास प्रतिबंध करण्यासाठी, भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी, 31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘भ्रष्टाचारमूक्त भारत-विकसित भारत’ (Corruption free India for a developed Nation) ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे. दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त संस्थांमार्फत या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 31 ऑक्टोबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख किंवा ज्येष्ठतम अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी / कर्मचारी प्रतिज्ञा घेतील. प्रतिज्ञा घेतल्यानंतर राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येईल. कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास तक्रार कोठे करावी. याबाबत संबंधित नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे. तसेच, भ्रष्टाचारास आळा बसण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्वाचा असल्याने ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित कोणतीही घटना घडत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण भवन इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील बैठक कक्षात भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण विभागाचे उप आयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी केले आहे.