CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
भुसावळ : (प्राजक्ता चौधरी) : तालुक्यातील फुलगांव येथील राम मंदिर ११२ वर्षे जुने आहे. राम मंदिर हे भरवस्तीत आहे. या राम मंदिराला प्रसिद्ध लेखक साने गुरुजी यांनी भेट दिली आहे. इंग्रज काळापासून मंदिर असून सागवानी लाकडांमध्ये तीन मजली असलेले एकमेव राम मंदिर आहे. पूर्वी या मंदिरात शाळा भरली जात होती. या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या अनेक व्यक्ती चांगल्या पदावर कार्य करित आहे. या मंदिरात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सितामाई , हनुमान अशा एकून दहा मूर्त्या असून मंदिराला चार ही बाजूने वेगवेगळ्या पद्धतीचे बारीक नक्षीकाम केलेले आहे.
या राम मंदिरात महात्मा गांधी यांच्या काळातील लाकडी चरखा असून त्यास पाहण्यासाठी जळगांव, भुसावळ व वेगवेगळ्या गावावरून विद्यार्थी व इतर व्यक्ती येतात. राम मंदिरात रोज पूजा आरती व उत्सव साजरे केले जातात. या मंदिराची संस्था असून मंदिरासाठी शासनाकडून आतापर्यंत कोणतेही निधी उपलब्ध नसून सर्व काही सुविधा देणगीदारांकडून केलेल्या आहे. राम मंदिरात रामनवमीचे आयोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापक गोपाळ पाटील व उपसरपंच राजकुमार यांनी सांगितले.