CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

क्रिडाशिक्षक पुरस्कारांसाठी आशिष चौधरी सरांची निवड

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

भुसावळ : - (वरणगांव) जळगांव जिल्हा शारिरिक शिक्षक व क्रिडा शिक्षक महासंघांकडून दिल्या जाणाऱ्या आर्दश क्रिडा शिक्षक पुरस्कारात यावर्षी वरणगांव येथील महात्मा गांधी विद्यालयाचे उत्कृष्ठ शिक्षक म्हणून क्रिडा क्षेत्रात नाव लौकिक असलेले व्यक्तीमत्व आशिष चौधरी सर यांना २०२३ चा बहुमान प्राप्त झाला आहे .

दि. २६ रविवार २0२३ रोजी पुरस्कार जाहीर करण्यात आला. शाळा, गांव, तालुका, जिल्हा, राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
शारीरिक शिक्षक व क्रिडा शिक्षक महासंघांकडून क्रिडा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून प्रस्ताव मागविण्यात येतात . निवड समिती उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांची पुरस्कारांसाठी निवड करते . वरणगांवयेथील महात्मा गांधी विद्यालयातील क्रिडाशिक्षक आशिष चौधरी सर यांची निवड झाल्याचे जाहिर केले. आशिष चौधरी सर यांनी त्यांच्या कार्यात तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय हॅन्डरेसलिंग, खो-खो सारखे विशिष्ठ खेळांमध्ये त्यांनी मुली व मुले यांना आंतरराष्ट्रीय स्तरांवर खेळून महात्मा गांधी विद्यालयासह गांव, तालुका, जिल्हा, राज्याचे नाव उज्ज्वल केले. त्यांनी क्रिकेट, खो - खो , कबड्डी, अॅथलेटिक्स, हॅन्डरेसलींग, मल्लखांब , विविध स्पर्धामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यानी यश मिळविले. आशिष चौधरी सरांचा सिहांचा वाटा आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यत मैदानावर स्वतःहा बसून त्यांनी विद्यार्थी घडविले .
आशिष सरांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वरणगांव दि. एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष वंदना पाटील व सर्व सभासद सहकार क्षेत्रातील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर , महात्मा गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण , शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी, क्रिडा व शिक्षक पत्रकार, राजकीय विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.