CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोटेचा महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन संपन्न

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

वरणगांवहून प्रतिनिधी : प्राजक्ता चौधरी

भुसावळ : येथील श्रीमती प . क . कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना , अँटीरैगिंग समिती व आई सी सी यांच्या तर्फे दि. ८ मार्च २३ बुधवार रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला . या महाविद्यालयामध्ये "भारतीय स्त्रीरत्न" या विषयावर पोष्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्याचे उद्‌घाटन भुसावळ शहरातील डॉ. सुषमा उमेश खानापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी मा. सौ. हेमा अ. पाटील , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वकील संघचे अध्यक्ष तुषार पाटील , एडव्होकेट कु. सुजाता वाघोदे , वरिष्ठ विधितज्ञ कैझार भारमल हे उपस्थित होते . उद्‌घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीस प्रा. डॉ. जान्हवी तळेगांवकर यांनी प्रास्ताविक सादर केले. प्रमुख अतिथी डॉ. सुषमा उमेश खानापूरकर यांनी दासबोधातील ओवींचा दाखला देत आजच्या पिढीवर संस्कारांची आवश्यकता विस्तृत करून सांगितली . एडव्होकेट सुजाता वाघोदे यांनी स्त्री कायदा विषयक माहिती दिली. तर आपल्या मार्गदर्शनामध्ये तुषार म्हणाले की जागतिक महिला दिनानिमित्त जर सगळ्यात पहिल्यांदा सत्कार करायचा असेल तो आपल्या आईचा केला गेला पाहिजे .तर न्यायाधीश सौ. हेमा पाटील यांनी डोनोस्टिक व्हायोलन्स विषयक कायद्यांची माहिती देतांना महिलांच्या आयुष्यातील विविध टप्पांवर उपयोगी पडतील अश्या कायद्याविषयी चर्चा केली. संस्कार आणि सामाजिक शिस्त यातूनच उद्याच्या सुसंस्कृत आणि सुदृढ समाजाची जडणघडण होणार आहे . याप्रंसगी गांधी विचार परिक्षेत सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थिनी तसेच शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे आयोजित विविध स्पर्धा मधून प्राविण्य प्राप्त विद्यार्थिनीना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

सदर काय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंगला साबद्रा, उपप्राचार्य डॉ. व्ही.एस. पाटील आणि श्री. वाय.डी. देसले सर तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. सरोज शुक्ला यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस.के. अग्रवाल यांनी केले. तर प्रा. सौ. निता चोरडिया यांनी ऋण निर्देश केले .