CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगावात १६ दिवसापासून पिण्याचे पाण्याचे हाल

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

प्रतिनिधी निलेश चौधरी वरणगावहून
भुसावळ : - वरणगांव येथील काही भागात १६ दिवसांपासून पिण्याचे पाणी न आल्याने संतप्त महिलांनी व नागरिकांनी चौधरी वाडा ते झोपे वाड्यात वरणगांव नगरपरिषदेची गाडी दि . २७ फेब्रुवारी २३ रोजी दुपारी ३ .०० वाजता अडवली . महिलांनी व पुरुषांनी गाडी थांबवून गाडीवरील कर्मचार्‍यांना जाब विचारला .पाणी व सफाईबाबत तक्रारीचा पाढा नागरिकांनी वाचला . त्यात कचरागाडी १० ते १२ दिवसांपासून येत नाही . गटारी साफ केल्या जात नाही . नागरी सुविधा न देता घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीला येऊन कनेक्शन कट करण्याची धमकी दिली जाते . या वाड्यात नेहमी पाणी रात्री सोडले जाते . येथे शेतकरी व शेतमजूर आहे. दिवसभर काम करून आल्यानंतर त्यालापाण्याकरीता रात्रभर जागरण करावे लागते . नगरपरिषदचे मुख्याधिकारी समीर शेख फोन उचलत नाही .

अशी ओरड संतप्त महिलांनी केली. ठेकेदाराने पाईपलाईनची जोडणी योग्य पद्धतीने न जोडता एकाच व्हॉल्व वर मोठा परिसर जोडला . या भागात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ठेकेदाराला पाईपलाईनचा ठेका दिलेला आहे परंतु तो सर्व गढूळ पाण्याचा आहे. वरणगांव शहराला स्वच्छ पाणी कधीच मिळत नाही . वरणगांव येथील महिला रस्त्यावर उतरल्याने खळबळ उडाली..