CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
प्रतिनिधी निलेश चौधरी
वरणगाव :- सावदा येथील पोलीस उपनिरिक्षकास मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती नुसार , सावदा शहरातील बडा आखडा परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली . सदर माहिती सावदा पोलीसांना कळताच पोलीसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. हाणामारी करणाऱ्या चौघांनी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांना जोरदार धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना घडली .
पोलीस नाईक मोहसीन खान शब्बीर खान पठाण यांच्या फिर्यादीवरून - १) शेख साबीर उर्फ बडा बाबू . २ ) शेख गुलाम शेख मंजूर ( दोन्ही रा . बडा आखाडा , सावदा ) ३ ) रितेश संतोष पाटील ४ ) उल्हास कडू पाटील (रा. सावदा ) यांच्यावर गुर नं. ३४ / २०२३ भा.द.वि. कलम ३५३ / ३३२ / ५०४ / १६० याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यातील शेख साबीर उर्फ बडा बाबू , शेख गुलाम शेख मंजूर , उल्हास कडू पाटील यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे . तसेच रितेश संतोष पाटील हा फरार आहे. यांचा पुढील तपास एपीआय जालींदर पळे करीत आहे.