CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

गरवारे नाका येथे ट्रक व फोर व्हिलर मध्ये जोरदार धडक

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

नाशिकहून : दिनेश सोमासे

नाशिक : आज सकाळी ११ वाजता गरवारे नाका येथे ट्रक व फोर व्हिलर मध्ये जोरदार धडक झाली यात कारचे नुकसान झाले आहे .मात्र जीवित हानी टळली. CG 07 AV 3787 या ट्रक चालकाने गरवारे नाका ब्रीज खालून वळण घेत असताना त्याच्या मागून येणाऱ्या कारने MH02BR2077 त्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला परंतु ट्रक मोठा असल्याने कार ओव्हरटेक न होता सरळ ट्रक च्या पुढच्या बाजूस लागली व ड्रायव्हर साईड मध्ये घूसली यात कारचे नुसकान झाले.

घटना स्थळी अंबड वाहतुक शाखेचे कर्मचारी माने व इतर कर्मचारी हजर होऊन तेथे जमलेली वाहतुक दुर करून ट्रक व कार योग्य जागेवर लावून अंबड पोलीस स्टेशनाला अपघाताची माहीती दिली. तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक पराग यांना कळविले . असे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात येथे रोड च्या दोन्ही बाजूस स्पीड ब्रेकर बसविण्याची गरज आहे . येथे अनेक प्रकारच्या ओमिनी रिक्षा उभ्या असतात. अशा मोठ्या दुर्घटना पुन्हा होऊ शकतात. याची दक्षता पालिका व वाहतुक शाखेने घ्यावी. व उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.