CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
भुसावळ :- तालुक्यातील वरणगांव शहरात येथे मुर्ती प्राणप्रतिष्ठा महायज्ञ सोहळा व संगीत देवी भागवत कथा सोहळा दि . 2 फेब्रुवारी २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आयोजीत करण्यात आला आहे.श्री. पांडूरंगाच्या कृपेने गुरुवर्य ह.भ.प. भरतजी महाराज तसेच झेंडूजी महाराजांच्या परंपरेतील सर्व ह.भ.प सेवक मंडळी आर्शिवादाने मनुदेवी नवयुवक सेवा मंडळा तर्फे श्री . मनुदेवी न माता , श्री . गणपती, श्री . नागदेवता मुर्ती प्राणप्रतिष्ठा व संगीत देवी भागवत कथा सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. संताचे अवतारकार्य मानव जातीच्या कल्याणासाठी असते .
' तुम्ही संत मायबाप कृपावंत , काय मी पतीत कीर्तन वानू, अवतार तुम्हा धराया कारणे , उद्धराया जन जड जीवा , या संतानी निरूपण केले . या जगात आई वडिलांना स्वतःची किंवा आपल्या मुलांबाळा ची किंवा नातेवाईकांची चिंता असते . सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी संतांचा अवतार असतो . या जगात संतांचे अवतार होऊन गेले . लोकांना त्यांचे मोठेपण समजले नाही . संतांना सामाजाने एवढा त्रास दिला कि त्यांना जीवंत जगतांना त्रस्त करून सोडले . तरी त्यांनी समाजाला सन्मार्ग दाखवत सर्वांचा उध्दार केला '