CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भुसावळ तालुक्यात गावांमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

प्रतिनिधी : प्राजक्ता चौधरी
भुसावळ : - शहरातील फेकरी, साकरी, झेटीएस, तापी प्लॉट, साकेगांव , व दिपनगर परिसरात सौम्य प्रमाणात भूकंपाचा धक्का जाणवला असे नागरिकांमधून बोलले जात आहे. दि . २७ जानेवारी रोजी सकाळी १०:४० मिनिटांनी सौम्य प्रमाणात भूकंप जाणविल्याने परिसरातील महिला, लहान मुंल व नागरिक घाबरून घराबाहेर निघाले . तसेच शाळा, कॉलेजस् मधील विध्यार्थ्यांना शाळेतून बाहेर ग्रॉऊन्डवर उभे केले . दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र ६६० प्रकल्पातील कामगारांना सुद्धा सौम्य धक्का जाणवल्याने ते ही काम सोडून सुरक्षित ठिकाणी पळाले.

भुसावळ परिसरातील नातेवाईकांनी एकमेंकाना फोन करून विचारणा केली . नाशिक येथील भूकंप विषयक माहिती केंद्राच्या २७८ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंद असल्याचे जाहीर करण्यात आले. प्रशासक सर्तक असून नागरिकांना सर्वतोपरी मदत करणेस तयार आहे. असे अमन मित्तल जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

भूकंपाविषयी कुठलीही माहिती घावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्रंमाक ०२५७ - 22३१८0 व ०२५७ - २२११९३ या क्रंमाकावर नागरिकांनी संपर्क करावा .