CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
प्रतिनिधी : निलेश चौधरी
भुसावळ : - राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक ६ वर हॉटेल चाहेल पंजाब या धाब्यावर वाहनांच्या माध्यमातून अवैधरित्या पाणी व अन्य वस्तूची वाहतूक केली जात होती . माहिती मिळाल्यावरून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शामकुमार लोही, त्यांच्या पथकाने दुपारी १२ वाजेच्या सुमारास धडक कारवाई करून ७ लहान , मोठे वाहन जप्त केले असून रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती . अवैध यवसायिकामध्ये घबराट निर्माण झाली . उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शामकुमार लोही यांच्या चार गाड्यांचा ताफा १0 ते १५ अधिकारी कर्मचारी व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी चाहेल ढाबा गाठून उभ्या असलेल्या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी केली . अनेक त्रुटी आढळून आल्या . वाहनांच्या मूळ रंगात व आकृतीत बदल नोंदी नसणे . पी . यु . सी . नसणे मूळ वापरा व्यतिरिक्त अन्य वैध वाहतूक करणे . अशा त्रुटी आढळून आल्याने पथकाने ही सर्व वाहने जप्त करून प्रादेशिक परिवहन विभागाच्या अप्पर प्रादेशिक कार्यालय जळगांव येथे जमा केले .
चाहेल ढाब्यावर विक्की चाहेल ऊर्फ गुरमदर चाहेल यांच्या मालकीचे स्वराज कंपनीचे ८५५ ट्रॅक्टर व मागे लावलेले मोठे टँकर आणि त्या ठिकाणी दोन ट्रॅक्टर व पाण्याचे टँकर यांच्यासह क्रंमाक एम . एच . २९ टी ४३८९ छोट्या टेम्पोवर लावलेले टँकर एकून ३ टँकर व चार पाण्याचे लहान - मोठे टँकर आरटीओ अधिकार्यांनी जप्त केले . स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर व मागील टँकरची कोणत्याही प्रकारची नोंदणी आरटीओ खात्यात नव्हती . तसेच मध्यप्रदेश पासिंगची बुलेट व अनधिकृत मोडि फिकेशन यासाठी ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला .
ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शामकुमार लोही, मोटार वाहन निरिक्षक नितिन संखला , धिरज पवार , दिपक ठाकूर, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण मोरे, रविंद्र जाधव, गणेश लवाटे, निखिल गायकवाड , मयूरी चौधरी, संजय बहिराम यांच्या पथकासह बाजारपेठ पोलीस ठाण्याचे राहुल गायकवाड व कर्मचारी यांनी केली . बाजारपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती .