CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
प्रतिनिधी : निलेश चौधरी
मुक्ताईनगर : - शनिवार दि. २१ जानेवारी २०२३ रोजी पहाटे ४ वाजता शिरसाळा ता . बोदवड येथून जागृत बजरंग बलीचे दर्शन घेऊन बऱ्हारपूरकडे परत जात असतांना सारोळा - माळेगाव दरम्यान वळण रस्त्यावर एका बोलेरो चारचाकी गाडीने कट मारल्याने अपघातात झालेल्या १) मनोज प्रमोद ठाकूर (वय - २०), २) मोहित गणेश महाजन (वय - १९ ) हे दोघे रा. रास्तीपुरा , बऱ्हारपूर जखमी झालेले असून मनोज ठाकूर यांचा पाय तूटून तो गंभीर जखमी झाला .
पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशन पो . कॉ . गणेश मनुरे , पो. कॉ . धमेंद्र ठाकूर तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका घेऊन चालक रवि जंगले व आरोग्य सेवक प्रदीप काळे लगेच घटना स्थळी गेले . जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले . व मनोज ठाकूर यांचा पाय पिशवीत टाकून आणावा लागला . अशी माहिती प्रदीप काळे यांनी दिली . जखमींवर डॉ . शोएबखान , डॉ. प्रशांत रामवंशी , आरोग्य सेवक प्रदीप काळे, परिसेविका कल्पना नगरे, सुनिता कसबे यांनी उपचार केले . तसेच जखमींना पुढील उपचारार्थ जखमींच्या नातेवाईकांच्या सहमतीने बऱ्हारपूर येथे हलविण्यात आले .