CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
प्रतिनिधी : निलेश चौधरी
एरंडोल : - मर्सिडीज कार क्रमांक एमएच - १५ एचवाय - ०७०० जळगांव कडून नासिकच्या दिशेने भरधाव वेगात जात होती . पिपळकोठा गावाजवळ महामार्गावर सांयकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला . मर्सिडीज चालक व अन्य दोघांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली . काही वाहन चालकांनी कारचालक व दोघा प्रवाशांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.मयत :- १) घनश्याम भानुदास बडगुजर ( वय -२० ), २) नितीन जामसिंग पाटील ( वय - २४) हे दोघे दुचाकी क्रमांक जीजे - १९ एसी - ७५४० या दुचाकीने घरी जात होते . नितीन पाटील याच्या पश्चात आई, वडील , भाऊ आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. आणि घनश्याम बडगुजर यांच्या पश्चात आई, वडील व बहिण असा परिवार आहे. या अपघातात ज्ञानेश्वर गणसिंग पाटील ( वय - २२० ) हा युवक रस्त्याच्या कडेने पायी शेतात जात होता . ज्ञानेश्वर गणसिंग पाटील याचे २१ जानेवारीला लग्न होते . याबाबत मर्सिडीज कार चालकविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो. हे . काशिनाथ पाटील करित आहे.