CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
प्रतिनिधी निलेश चौधरी
रावेर- रावेर तालुक्यात चिनावलसह परिसरात पुन्हा चोरट्यांचा धुडगुस सुरु असून वडगांव शिवारात माथेफिरुंनी पुन्हा एकदा केळीची हजारो खोडे कापल्याने शेतकरी आक्रमक झाले . याकडे कुणी गांभिर्याने पाहत नसल्याने आज शेतकऱ्यांनी रुद्रावतार धारण करत शेतकर्यांनी मोठे वाघोदे येथे महामार्गावर ' रास्ता रोको' आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केली . चोरांना पकडल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाही . अशी पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केले .
चिनावल येथील प्रकरणात पोलीसांनी कारवाई न केल्याने चोरटे मुजोर झाले असून" आता तरी चोरट्यांवर कारवाई होणार का?" असा प्रश्न संतप्त शेतकऱ्यांनी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीष महाजन यांना विचारले . नक्कीच कठोर कारवाई होईल असे आश्वासन देण्यात आले . कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे.