CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मद्यपी पतीची पत्नीकडून निर्घृण हत्या, पत्नी विरोधात वरणगांव पोलीसांत गुन्ह्याची नोंद

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

मद्यपी पतीची पत्नीकडून निर्घृण हत्या, पत्नी विरोधात वरणगांव पोलीसांत गुन्ह्याची नोंद

प्रतिनिधी निलेश चौधरी/ डॉ.शशीकांत काळे

वरणगांव : - दगडू पुंडलिक सुरवाडे वय - ४५ रा.पाचदेवळी, ता बोदवड ,जि.जळगाव हा रोज रात्री कामावरून घरी परतायचा तो रोज दारू पिऊन घरी गेल्यावर स्वतःच्या पत्नीवर चारित्र्यावर संशय घेत पत्नी आशाबाई दगडू सुरवाडे वय - ३८ हिला त्रास द्यायचा पतीच्या छळाला कंटाळून आशाबाईने लोखंडी विळ्याने वार करून पतीची निर्घृण हत्या केली . हि घटना दि. ११ नोव्हेंबर रविवार रात्री ८.३० वाजता घडली. मुलगी रोशनी दगडू सुरवाडे वय - १७ ही अंगणात रात्री शेकोटीजवळ बसलेली होती. तिला आवाज आला म्हणून ती घरात गेली, आणि समोरील दृश्य पाहून ती घाबरली तिने मदतीसाठी शेजार्‍याकडे धाव घेतली .

 

ती घरात येण्यापूर्वी आशाबाई ने पतीवर सपासप वार केले त्यात दगडू पुंडलिक सुरवाडे जागीच ठार झाला. आशाबाई हिच्यावर कलम सीसीटीएनएस (Crime and Criminal Tracking Networks and Systems) गु. र. नं. २४२ / २०२२ भा .द .वि .कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून घटनास्थळी नासिक येथील परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. बी. जे. शेखर - पाटील ,पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पो. अ.चंद्रकांत गवळी, जळगांव जिल्हा, S D PO प्रताप शिकारे उपविभागीय पो. अधिकारी मुक्ताईनगर, यांनी भेट देऊन पुढील तपासाचे आदेश दिले.पुढील तपास API आशिषकुमार आडसूळ व मनोहर पाटील करित आहे