CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

गोरक्षकावर जीवघेणा हल्ला शहरात तणावपूर्ण शांतता

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

प्रतिनिधी :निलेश चौधरी
सावदा : येथील भारतीय जनता पार्टीच्या शहरध्यक्षासह ४ ते ५ गोरक्षकावर सोमवारी दि . २८ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.सोमवार दि. नोव्हेंबर २०२ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास सावदा शहरातील कत्तलखान्याजवळील रोडवर सार्वजनिक जागेच्या परिसरात भा.ज.पा.चे शहर अध्यक्ष जितेंद्र किसन भारंबे वय -४२ धंदा - किराणा दुकान ) यांच्यासोबत ४ ते ५ मुलांनी कत्तलखान्याजवळ गुरांची गाडी पकडली. ते त्या ठिकाणी शहानिशी करण्याकरिता गेले . त्या कारणावरून मुस्लीम मुलांनी त्यांना तलवार , रॉड, गावठी कठ्ठा, व लाथा बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली .मारहाण करणारे बिलाल कुरेशी, अशपाक कुरेशी, कादीर कुरेशी, यांच्या सोबत ३० ते ४० मुस्लीम मुले होती .

जितेंद्र किसन भारंबे यांच्या डोक्यास गावठी कठ्ठा लावून बंदुकीचा मागील भाग डोक्यात मारला . तसेच पवन भास्कर महाजन , अक्षय हिरामण पाटील, गणेश लक्ष्मण देवकर, पंकज प्रमोद चौधरी रा सावदा यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला .फैजपूर येथील डॉ. खाचणे आर्शिवाद हॉस्पिटल मध्ये जखमींना उपचारासाठी भरती करण्यात आले . खासदार रक्षाताई खडसे यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली . व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे पोलीस विभागास निर्देश दिले .सावदा शहरात फैजपूर, मुक्ताईनगर, यावल या ठिकाणाहून पोलीस बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले .

फैजपूर व भुसावळचे उप. विभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय.जालिंदर पळे हे पुढील तपास करीत आहे.