CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

फेकरी रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

वरणगावहून : निलेश चौधरी

भुसावळ : - फेकरी येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दोन वाहनांचा भीषण अपघात झाला . दि . १३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास हि घटना घडली . फेकरी गावाचे पोलीस पाटील किशोर बोरोले हे दरोरोज पहाटे फिरण्यासाठी जात असतांना त्यांना अपघात झाल्याची बातमी मिळाली.

त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फेकरी रेल्वे उड्डाण पुलाजवळ नॅशनल हायवे क्रं ६ वर दोन वाहनांचा अपघात झाल्याचे त्यांना दिसले . मालवाहू वाहनाजवळ एक वाहन चालक रोडवर जखमी अवस्थेत पडला होता . त्याच्या डोक्याला जबर मार लागून कानातून रक्त वाहत होते. हायवे रोडवर एक माल ट्रक क्र. जी जे . ०३- बी . टी . ५७२८ हे वाहन रोडवर पलटी झालेले होते .ट्रक मधील माल स्टाईल्स हे रोडवर फेकले गेले होते . एक अपघातग्रस्त मालवाहतूक वाहन क्रं . एम एच २८ ए बी ४३३४ या वाहनाच्या पुढील कॅबिन पूर्णपणे चक्काचूर होऊन मास्यांनी भरलेले कॅरेट रोडवर पडले . अपघातानंतर ट्रक चालक घटना स्थळापासून पसार झाला .

ट्रक क्र. जी जे ०३- बी टी ५७२८ यावरील चालक याने त्याच्या ताब्यातील मालट्रक हा भुसावळकडून वरणगांवकडे भरधाव वेगाने येत होता . वरणगांवकडून भुसावळकडे मालवाहतूक ( छोटा हत्ती ) क्र . एम एच २८ ए बी ४३३४ या वाहनास जबरदस्त धडक दिल्याने वाहनातील चालक रोडवर फेकला गेला. त्याच्या डोक्याला मार लागून कानातून रक्त वाहत होते . जखमीचे नांव शिवचरण अरुण मानेकर ( वय 2 ८ ) रा. पहूर पूर्णी, जिल्हा- बुलढाणा) त्याला जळगांव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेतांना मृत्यू झाला . व डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले