CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
निलेश चौधरी
भुसावळ :- शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीशी मैत्री करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला .भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला .शहरातील एका भागात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासोबत राहत होती . संशयित आरोपी राज लोणारी याने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली . तिला तापी नगर मधील फोटो गॅलरी मध्ये नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार सुरु केला . अत्याचार केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली . तिचा विनयभंग केला . पिडितांच्या आई वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली . पिडित मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून १५९/ 2022 कलम ३०६, ३५४( ड) ४४८, ५०६ बाल लैंगिक अत्याचार कलम ४, ८, १2 प्रमाणे भुसावळ शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.