CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
संस्कार चौधरी
सावदा ,जि . जळगाव :- एपीआय व पीएसआय लाच घेताना जाळ्यात अडकल्याने पोलीस ठाण्यात कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते . रात्री उशिरा सावदा पोलीस स्थानकाची सध्या एलसीबीमध्ये असणारे एपीआय जालींदर पळे यांच्याकडे सावदा पोलीस स्थानकाचा कार्यभार देण्यात आला आहे.
सावदा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक डी.डी. इंगोले व पोलीस उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी एका प्रकरणात आरोपींना अटक न करण्यासाठी संबंधितांकडे ६० हजारांची लाच मागितली.
नंतर पुन्हा १५ हजारांची लाच मागितल्याने दोन्हीं अधिकर्यांना काल सकाळी लाचलुचपत खात्याच्या पथकाने उचलल्याने खळबळ उडाली . मोठे अधिकारी सापडल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागून होते . दोन्हीं अधिकार्यांना दुपारच्या सुमारास अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला . दोन्ही अधिकारी अटकल्याने त्यांची जागी कोण येणार याबाबत मोठी उत्सुकता लागली होती . एलसीबीमध्ये कार्यरत असणारे एपीआय जालींदर पळे यांनी रात्री उशीरा पदाचा कार्यभार सांभाळला.