CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
कल्पेश चौधरी / निलेश चौधरी.
भुसावळ : शहरातील खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात अमृतसरच्या तरुणाचा गळा चिरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे .या संदर्भात मयताच्या चार मित्रांविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलीसात गुन्हा दाखल . खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ बातमी पसरली .
मनमीतसिंग गुरुप्रीत सिंग( वय १९) रा.अमृतसर पंजाब या युवकाचे नांव आहे. मनमीतसिंग आपल्या पाच मित्रसह बुधवार दि. २६ रोजी नांदेड - अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाले . मात्र डी - २ डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाला . त्यांनी संबंधितासी मारहाण केली . संबंधिताने RPF यांची संपर्क साधल्यानंतर पाच तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले . गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमातसिंग चा मृतदेह आढळून आला . लोहमार्ग पोलिसांनी सुरुवातीला अस्कमात मृत्यूची नोंद केली . मृत व्यक्तीचे हात , पाय, खांदा हे फ्रॅक्चर झाल्याचे तसेच गळा सुद्धा चिरल्याने आढळून आले . मयताच्या भावाने फिर्याद दिल्यांनतर खूनाचा गुन्हा दाखल झाला . सोबतच्या चार ही मित्रांनीच खून केल्याचा संशय आहे. मृत व्यक्तीजवळ डेबिट कार्ड होते . कार्ड पंजाब अॅन्ड सिंद या बॅकेचे होते . त्या कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथे बँकेत चौकशी करून त्या कार्डावरून मृतदेहाची ओळख पटविली . पोलीस निरिक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहे.