CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
निलेश चौधरी
जळगांव - माहेरून २५ लाख ऊपये आणावे . नशिराबाद येथील विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप समोर आला.मंगळवारी २५ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात पतिसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल झाला.जळगांव तालुक्यातील नशिराबाद येथील माधवी अतुल बढे( वय ३३) यांचा विवाह पुणे येथील अतुल लिलाधर बढे यांच्याशी झाला . लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेरून २५ लाखांची मागणी केली.विवाहितेने पैसे आणले नाही.म्हणून तिचा शारिरिक व मानसिक छळ केला.तिला शिविगाळ करून मारहाण केली . तिचे सासरे, सासू, नणंद यांनी छळ केला . या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. नाशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेतली.
तिच्या तक्रारीवरून पति अतुल लिलाधर बढे, सासरे लिलाधर डालू बढे, नंदोई दिनकर महारू राणे, ननंद सुनिता दिनकर राणे, भाची सायली दिनकर राणे रा . रूपानगर पुणे यांच्या विरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला .