CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाशिक येथे 200 निवासी क्षमतेचे मुलींसाठीचे वसतिगृह सुरु होणार - चंद्रकांत पाटील

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

मुंबई, : मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याचाच भाग म्हणून नाशिक येथे 200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

श्री. पाटील म्हणाले, ‘इतर मागासवर्ग समाजातील विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देखील मिळाव्यात, अशी शासनाची भूमिका आहे. नाशिक येथे सुरू करण्यात येणाऱ्या वसतिगृहात सारथी व महाज्योती या महामंडळाच्या त्यांच्या लक्षीत गटातील प्रत्येकी 75 मुलींना प्रवेश देण्यात येणार असून उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील 50 मुलींना प्रवेश असे 200 मुलींचे वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण जनशताब्दी महोत्सव योजनेअंतर्गत नाशिक येथे बांधण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठीच्या वसतिगृहात सारथी व महाज्योती या महामंडळाच्या विद्यार्थिनींना प्रवेश देऊन वसतिगृहाच्या दैनंदिन कामकाजावर सारथी व महाज्योती महामंडळाचे नियंत्रण असेल आणि वसतिगृहाच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च सारथी महामंडळ करेल, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.