CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

आईन बॉल स्पर्धेत कु.मोहिनी बाऊस्कर राज्यात पहिली तर राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर विजयी : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

रिपोर्टर : कु.प्राजक्ता चौधरी / कल्पेश चौधरी

वरणगाव : आईन बॉल स्पर्धेत थोरगव्हाण येथील कु.मोहिनी बाऊस्कर वय २० वर्षे राज्यात पहिली तर राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर विजयी झाली. तीचे मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कौतुक करुन तीला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी थोरगव्हाणचे शिवसेना शाखा प्रमुख पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितिन चौधरी , आपले सरकार सेवा क्रेंद प्रमुख उमेश कोल्हे , शेखर बाऊस्कर आणि ग्रामस्त उपस्थित होते. ty

कु.मोहिनी शेखर बाऊस्कर या विद्यार्थिनीने डी.एस.देशमुख हायस्कूल मध्ये १० वी पर्यत शिक्षण पूर्ण केले. नंतर तिने ११ वी, १२ वी डी.एन.कॉलेज फैजपूर येथे तर त्यापुढील पुढील शिक्षण आर.सी.पटेल कॉलेज शिरपूर येथे T.Y.B Tech cosmetics.शिक्षण चालू आहे.तिने थोरगव्हाण येथे असतांना थाळी फेक , गोळा फेक, कबड्डी स्पर्धेत सहभाग घेऊन राज्य स्तरापर्यत अव्वल क्रमांक मिळवून राज्य खेळाडू म्हणून कु.मोहिनी खेळली आहे . डी.एस.देशमुख हायस्कूल विद्यालयातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, क्रिडा शिक्षक यांनी कु. मोहिनी शेखर बाऊस्कर हिचे हार्दिक अभिनंदन करून तीला शुभेच्छा दिल्या

qqकु. मोहिनी बावस्कर या खेळाडूची क्राईम बॉर्डरच्या युवा रिपोर्टर कु.प्राजक्ता चौधरी व कल्पेश चौधरी तसेच सिद्धांत चौधरी व निलेश चौधरी या टीमने तिच्या कामगिरीची दखल घेऊन, तिच्या घरी जाऊन भेट घेतली व तिचे क्राईम बॉर्डर व भरोसा फाउंडेशन तसेच आश्रय महिला संस्था , कल्याण जि . ठाणे च्या वतीने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.r