CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
निलेश चौधरी डॉ. शशिकांत काळे
रावेर : मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती . 2 जानेवारी 2022 रोजी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल छपरीबंद आणि गौरव जावे रा. रावेर यांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले . रावेर तालुक्यातील पाल ठिकाणी नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला . अत्याचार केल्याचा व्हिडिओ चौघांनी काढून घेतला . पीडित मुलगी स्वतःची सुटका केल्यानंतर चौघांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्यावर अधून मधून बोलवत वारंवार अत्याचार करत होते . पीडित मुलगी गर्भवती राहिली. नाईलाजाने गोळ्या घेवून गर्भपात केला .
पीडिताचे वडिलांनी तिचे लग्न आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीसोबत लग्न लावून दिले . असा धक्कादायक प्रकार समोर आला . पीडितने रावेर पोलिस ठाण्यात धाव घेतली व तक्रार नोंदविली . या तक्रारीवरून संशयीत आरोपी रवि छपरीबंद, आनंद बाविस्कर, सुजल छपरीबंद, गौरव जावे, पुजा छपरीबंद आणि धिरज जावे रा . रावेर सहा जणांविरोधात रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक विशाल सोनवणे करीत आहे .