CRIME BORDER | 26 December 2025 | 03:56 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
कल्याण जि.ठाणे येथील क्राईम बॉर्डर चे पत्रकार तस्लीम इनामदार यांचे वडील दगडूमिंया पापामिंया इनामदार (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी) यांचे नुकतेच तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने अजमेर येथे निधन झाले.दगडूमिंया पापामिंया इनामदार यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले ते सन २०११ साली पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले होते.
त्यांनी ३९ वर्षे पोलीस डिपार्टमेंट मध्ये कार्य केले. रिटायर झाले तेव्हा ते पोलीस आयुक्तालय ठाणे येथे कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली ,एक भाऊ एक बहीण असा परिवार आहे.
इनामदार फॅमिली अजमेर येथे दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी दर्शनासाठी गेले होते. दगडूमिंया पापामिंया इनामदार यांना ४ नोव्हेंबर रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तेथील रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
त्यांचे पार्थिव हे ५ नोव्हेंबर २०२१ रोजी मलठन, जिल्हा पुणे या गावी आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर रितीरिवाजानुसार दफनविधी करण्यात आला. दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी मलठन या गावी दशक्रिया विधी होणार आहे.त्यांच्या दुःखात क्राईम बॉर्डर परिवार सहभागी आहे