CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
कापूसवाडी प्रतिनिधी :- मलकापूर शहरातील २२ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ७ रोजी उघडकीस आली .
याबाबत सविस्तर वृत्त असे की शुभम राजू चव्हान वय २२ वर्ष रा. यशवंत नगर असे आत्महत्या केलेल्या तरुनाचे नाव आहे . शुभम याने घरात कोणी नस्ताना पंख्याला दोरीच्या सहाय्याने गडफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३.३० च्या सुमारास उघडकीस आली .शुभम ची आई घरात जात असतांना खिडकी मध्यून घराच्या आत लक्ष गेले असता शुभमनी गळफास घेतल्याचे दिसून आले. शुभमच्या आई ने जोरात आरडा ओरडा केली असता परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. याबाबत शहर पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली. शुभमनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापपर्यंत समोर येऊ शकले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर शहर पोलीस करत आहे .