CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगावची दुर्दैवी घटना भरधाव वेगात ट्रॅक्टरची स्कूटीला धडक आई मृत्यूमुखी, तर मुलगा सुदैवाने बचावला

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

वरणगावची दुर्दैवी घटना भरधाव वेगात ट्रॅक्टरची स्कूटीला धडक आई मृत्यूमुखी, तर मुलगा सुदैवाने बचावला

वरणगाव प्रतिनीधी : निलेश चौधरी , जळगाव जिल्हा प्रतिनिधी डॉ. शशिकांत काळे

वरणगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड दुय्यम उप बाजार समिती वरणगाव समोरील जून्या महामार्गावर भरधाव वेगात ट्रॅक्टरची स्कूटी या दुचाकी वाहनाला धडक दिल्याने आई मृत्यूमुखी पडली तर मुलगा सुदैवाने बचावला आहे. ही दुर्दैवी घटना गुरुवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.ट्रॅक्टरचालका विरूध्द वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वरणगाव येथील दुय्यम उपबाजार समितीच्या आवारात चाटे इग्रंजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता. ४ थी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या चिमूकल्या कृष्णाला घेऊन घराकडे जाण्याकरीता ममता राजेंद्र जुबंळे (धनगर ) ह्या महामार्ग ओंलाडण्याच्या तयारीत असतांना अचानक वरणगावकडून मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या राखेने भरलेला ट्रॅक्टर क्रंमाक एम.एच.३४ एल ७११३ ने स्कुटी क्रंमाक एम.एच १९ बी.झेड १०५७ या स्कुटीला जोरदार धडक दिली.या धडकेत मागे बसलेला कृष्णा वय १० वर्ष हा जोराने फेकला गेला यात तो जखमी झाला आहे.मात्र त्याची आई ममता राजेंद्र जुबंळे (धनगर) वय ३५ राहणार जगदंबा नगर वरणगाव ह्या ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला .

 

या संदर्भात फिर्यादी रविंद्र गोविंदा धनगर, वय ५२, राहणार विकास कॉलनी यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि.आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार परशुराम दळवी करीत आहे.मयत ममता ह्या वरणगाव नगर परिषद पाणीपुरठा विभागाचे कर्मचारी राजेंद्र (भूरा) जुंबळे यांच्या पत्नी आहेत.मयताच्या पश्चात पती,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ममता यांचे शव विच्छेदन वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैदयकीय अधिक्षक क्षितीजा हेंडवे यांनी केले .

 

ट्रॅक्टर चालक फरार - वरणगाव परीसरात विटभट्टयांचे प्रमाण अधिक आहे त्याकरीता दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील जळालेली राख विल्हाळे बंडात सोडलेल्या राखेचा वापर केला जात असल्याने शहरातून मोठया प्रमाणात डंपर व ट्रक्टरच्या माध्यमातून राख विटभटयांवर आणली जाते.यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.त्याच प्रमाणे सदरची घटना कारणीभूत ठरली असून वाहन चालक मात्र फरार होण्यास यशस्वी झाला आहे .

 

बेकायदेशीर पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत. गुरुवारची दुर्घटना त्याचे उदाहरण आहे. या बेकायदेशीर चालणाऱ्या वाहनावर कारवाई झाली पाहिजे तरच अशा घटना घडणार नाही अशी जनतेतून मागणी होत आहे.

सदर घटनेने शहरात व परिसरात हळहळ व संताप व्यक्त होत आहे.