CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्यांतर्गत नाभिक समाजातील सर्व शासकीय, निमशासकिय ,सहकारी तसेच इतर क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक बंधू व भगिनींकडून जळगाव जिल्ह्याच्या नविन कर्मचारी संघटनेच्या कार्यकारीणीसाठी अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार जिल्ह्यातून जळगाव जिल्हा नाभिक महामंडळाकडे इच्छुकांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत .त्यानुसार *जळगाव जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेची नविन जिल्हा कार्यकारिणीची निवड व जिल्ह्यातील तालुका कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष या पदांची निवड महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दि. २० डिसेंबर २०२० रोजी दुपारी १.०० वाजता शानबाग सभागृह एम.जे. काँलेज चौफुली जळगाव येथे केली जाणार आहे* शासकीय व निमशासकिय कर्मचारी बांधवांनी व अर्जदारांनी तसेच जळगाव जिल्हा कार्यकारिणी प्रमुख व पदाधिकाऱ्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात श्री.नानाभाऊ शिरसाठ उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ श्री .मनोहर खोंडे सर जिल्हाध्यक्ष जिल्हा कर्मचारी संघटना जळगाव महाराष्ट्र नाभिक महामंडळ श्री .रविंद्र (बंटी) नेरपगारे जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी जळगाव जिल्हा महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी आवाहन केले आहे.