CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अहमदनगर जिल्हा न्यायालय अधीक्षक भाऊराव वाईकर यांची कौटुंबिक न्यायालयात प्रबंधक (रजिस्ट्रार) या पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

अहमदनगर : जिल्हा न्यायालयात अधीक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. भाऊराव वाईकर साहेब यांची अहमदनगर येथील कौटुंबिक न्यायालयात प्रबंधक (रजिस्ट्रार) या पदावर मा जिल्हा न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब यांचे आदेशानुसार पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक न्यायालयातील प्रबंधक हे पद रिक्तच होते. यासंदर्भात कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगर च्यापदाधिकारी यांनी यापुर्वीच प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब यांची भेट घेतली होती आणि फॅमिली कोर्ट ला प्रबंधक व दोन बेलीफ द्यावेत अशी विनंती केली होती.

त्यामुळे प्रधान जिल्हा न्यायाधीश श्री सुधाकर यार्लगड्डा साहेब व कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सौ नेत्राजी कंक मॅडम यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. श्री वाईकर हे अतिशय कार्यक्षमतेने कामकाज सांभाळणारे आहेत. जिल्हा न्यायालयात सुद्धा त्यांनी अगदी ज्युनियर क्लार्क पासुन ते अधिक्षक पदा पर्यंत पदोन्नतीने आले होते. नवीन प्रबंधक म्हणून कौटुंबिक न्यायालयात आपला कार्यभार घेतल्या नंतर कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगर च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड शिवाजी अण्णा कराळे, उपाध्यक्ष ॲड लक्ष्मणराव कचरे,कार्याध्यक्ष ॲड सुरेश लगड, सचिव ॲड अनिताताई दिघे, सह सचिव ॲड अर्चनाताई शेलोत खजिनदार ॲड राजेश कावरे, सदस्य ॲड एम बी अंबेकर, ॲड राजाभाऊ शिर्के ॲड शिवाजी सांगळे, ॲड अनुराधाताई येवले, ॲड सुचिताताई बाबर , ॲड करूणा शिंदे मॅडम, ॲड सत्यजीत कराळे, कौटुंबिक न्यायालयाचे अधिक्षक श्री जी.डी.जोशी साहेब आणि सर्व कर्मचारी वर्ग हे सर्व उपस्थित होते.