CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

१९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क - जुन्नर

मुंबई/जुन्नर :महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात शिवजयंतीचे औचित्य साधून १९ते २१ फेब्रुवारी २०२२ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून विविध सांस्कृतिक आणि खाद्य महोत्सव, कृषी पर्यटन हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असणार आहे.

या ऐतिहासिक जुन्नर शहरात द्राक्ष महोत्सवाचे या वर्षी हे५ वे वर्ष आहे. वर्षागणिक या महोत्सवाची लोकप्रियता वाढत असून शेकडोंच्या संख्येने पर्यटक महोत्सवाला भेट देत असतात . यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव होत असल्यामुळे याद्वारे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, तसेच कला कुसर करणारे कारागीर, बचत गट, लघु उद्योजकांच्या व्यवसायाला हातभार लागेल.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे . या महोत्सवात विविध जातींची द्राक्षे, द्राक्षांपासून बनवलेले विविध खाद्य पदार्थांचा तसेच बहारदार द्राक्षांच्या बागांमध्ये फिरण्याचा अनुभव घेता येणार आहे. या महोत्सवात पर्यटकांना हेरीटेज वॉक अंतर्गत जुन्नर शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा पाहण्याची संधी मिळणार असून, या वॉकमध्ये पंचलिंग मंदिर, शिवसृष्टी, मुघलकालीन खापरी पाईपलाईन, सौदागर घुमट, हबशी महाल इत्यादी ठिकाणांना भेट देण्यात येईल. रात्री पर्यटकांसाठी कॅम्प फायरची व्यवस्था केली जाजाणार आहे , जेथे पर्यटक आपल्या मित्र परिवारासोबत मजेशीर खेळ खेळून चांगला वेळ घालवू शकतील.

२० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या प्रसिद्ध शिवनेरी किल्ल्याची सफर आयोजित केली जाणार आहे. जुन्नरमधील देवराईमध्ये किंवा वनपरिक्षेत्रांत निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षण उपक्रमात सहभागी होता येईल. त्यानंतर कुकडेश्वर मंदिर, नाणेघाट इत्यादी ठिकाणी भेट दिली जाईल. शेवटच्या दिवशी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी हडसर किल्ला किंवा पर्वत गडावर ट्रेकिंगचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ओझर गावातील गणपती, गीब्सन स्मारक, अंबा अंबिका लेणी समुह, ताम्हाणे संग्रहालय, लेण्याद्री गणपती आदींचे दर्शन घेता येईल. तसेच स्थानिक जुन्नरच्या आठवडी बाजारांमध्ये जाऊन तेथील लोक पदार्थ-वस्तू पाहता आणि खरेदी करता येतील.

ही सुवर्णसंधी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी असणार आहे, कारण ते या ठिकाणी येऊन शेतातील ताज्या द्राक्षांचा आस्वाद घेऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे वाईन कशी बनते याची प्रक्रिया डोळ्यादेखत पाहून ते वाईन खरेदी करू शकतात. पर्यटक आमच्याकडे ब्लॅक करंट, मनुके आणि द्राक्षांचा ताजा रस यांचा मधुर आस्वाद घेऊ शकतात. त्याच पद्धतीने वेलीला लगडलेली द्राक्ष काढून ती विकत घेऊ शकतात, त्यामुळे खऱ्या अर्थाने ऑरगॅनिक फळ आपल्या आरोग्याच्या करंडीत समाविष्ट करू शकतात, असे पुणे विभागाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून द्राक्षाची लागवड आणि शेतीसाठी खूप चांगला पाठिंबा दर्शविला जाणार आहे. पर्यटक, शेतकरी आणि व्यावसायिक समूदाय यांनी एकत्र येऊन द्राक्षाच्या बाजारपेठेसाठी आर्थिकदृष्ट्या उचललेले हे अत्यंत महत्वाचे पाऊल असणार आहे. ज्यांना हा अमूल्य अनुभव घ्यायचा आहे, त्यांनी https://bit.ly/3tUCoQL या गूगल लिंक वर जाऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे

पुणे विभागीय प्रमुख : नितीन सैद

पुणे जिल्हा प्रतिनिधी : चित्रा कामत