CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नाभिक समाज भूषण कै. नानासाहेब एकनाथ परशुराम शिरसाठ यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

नाभिक समाज भूषण कै. नानासाहेब एकनाथ परशुराम शिरसाठ यांचे नावाने शिष्यवृत्ती योजना

भडगावः- येथील समाज भूषण कै. नानासाहेब शिरसाठ यांचे प्रथम वर्ष श्राध्द कै. लक्ष्मण भाऊ मंगल कार्यालयात संपन्न झाले. यावेळी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करत नानासाहेब यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.प्रथम वर्षश्राध्दपर श्रद्धांजली कार्यक्रमात नानासाहेब यांचे समाज कार्याचा व त्यांनी समाजोपयोगी राबविण्यात आलेल्या बहुविध कार्यक्रम व मेळाव्यांचा उल्लेख करून असा माणूस समाजाला लाभलेला हिरा होता. असा सर्वांनी आवर्जून उल्लेख केला व नानासाहेबांना समाज कधीही विसरणार नाही असा प्रत्येक वक्त्यांनी अगदी गहिवरून नानांचा गौरव केला.

 

नानासाहेबांच्या कार्याचा सुंगध कायम दरवळत राहावा तसेच त्याच्या स्मृती चिरंतन टीकावी यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जळगाव जिल्ह्यात नानांचे नावाने गरीब विद्यार्थीसाठी शिष्यवृत्ती योजना जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे यांनी जाहीर करत ही योजना वर्ष २०२२ पासुन कायम राबण्यात येणार आहे.यात प्राथमिक साठी ५ हजार रुपये, माध्यमिक साठी १० हजार रुपये, तर उच्च शिक्षणासाठी १५ हजार रुपये शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. तसेच नानासाहेब यांचा वारसा व शिरसाठ परिवाराचे समाजासाठी ऋणानुबंध पाहता त्यांचे लहान बंधू दादासो रविंद्र शिरसाठ यांना जिल्हा सर चिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली व ती त्यांनी स्विकारली.

 

यावेळी नाभिक महामंडळ महाराष्ट्र चे प्रदेश अध्यक्ष व बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष श्री.कल्याणराव दळे महाराट्र नाभिक महामंडळ प्रांत महिलाध्यक्ष सौ.भारतीताई सोनवणे ,जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे, महिला जिल्हा अध्यक्ष संगीता गवळी ,जिल्हा कर्मचारी अध्यक्ष मनोहर खोडें ,ऑल एड़िया सेन समाज सचिव राजकुमार गवळी,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे जामनेर,शिवाजीराव बहाळकर,उमकांत निकम,प्रशांत बानाईत, मधूकर आबा सैंदाणे अमळनेर, रवींद्र सैंदाणे चोपडा, सुधाकर सणांसे भुसावळ, जगदीश वाघ, कमलेश निकम, संतोष खोंडे, बापू सुर्यवंशी, किरण नेरपगार चाळीसगांव, रामभाऊ गांगुर्डे एरोडल, सुनील बोरसे चाळीसगांव यांनी श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली सभेचे सूत्र संचालन भडगाव नाभिक समाजध्यक्ष व जेष्ठ पत्रकार संजय पवार यांनी केले.

रवींद्र (बंटी) नेरपगारे यांनी शिरसाठ परिवारा च्या मागे नाभिक समाज सर्व सुख दुःखात ठामपणे पाठीशी उभा राहील अशी ग्वाही देत सामुदायिक श्रद्धांजली ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी जिल्हा भरातील नाभिक समाज पदाधिकारी समाज बांधव, बघीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते,