CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जळगाव : भादली जि.जळगाव येथील अल्पसंख्यांक नाभिक समाजातील प्रमोद राजू खंबायात यांचे केश कर्तनालय आहे.महागाई वाढल्याने नाभिक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली केस कापण्याचे व दाढीचे रेट वाढविण्यात आले.या गोष्टीचा येथील २३ वर्षीय मनोज या तरुणाला राग आला व त्याने याचा जाब प्रमोदला विचारत त्यांच्या टपरीवर (दुकानावर) विटा व दगड फेक करून दुकानाचे नुकसान करीत दहशत निर्माण केली.
सदर घटनेची माहिती प्रमोद खंबायत यांनी अखिल भारतीय जिवा सेनेचे (नाभिक समाज संघटना) प्रदेशाध्यक्ष देविदासभाऊ फुलपगारे यांना दिली असता अल्पसंख्यांक नाभिक समाजातील प्रमोद राजू खंबायात यांच्यावर झालेल्या हल्याची अखिल भारतीय जिवा सेनेने दखल घेत भादली येथील सर्व समाज बांधवांशी चर्चा केली व झालेल्या घटनेची माहिती घेतली.तात्काळ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपगारे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या समवेत नशिराबाद पोलीस स्टेशन गाठले व सर्व प्रकार नशिराबाद पोलीस स्टेशनचे पो.नि.अनिल मोरे,एपीआय राजेंद्र साळुंखे यांना या घटनेची माहिती देऊन कारवाईची मागणी केली.
तात्काळ माहितीच्या आधारे पो.नि.अनिल मोरे यांनी नाभिक समाजातील सर्वांच्या भावना ओळखून सलून दुकानाचे वाढीव रेट वाढविल्याचा राग मनात धरून दादागिरी करून प्रमोद राजू खंबायात यांच्या सलून दुकानावर विटा मारून नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या मनोज याला पोलीस ठाण्यात आणले या वेळी नशिराबाद पोलीस स्टेशनचे पो.नि. अनिल मोरे, एपीआय राजेंद्र साळुंखे,ठाणे अमलदर शिवाजी चौधरी स्थानिक नशिराबाद येथील राजकीय व्यक्तिमत्व व शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चव्हाण, अ.भा. जिवा सेना युवक जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ टोंगे, कार्याध्यक्ष विनोद भाऊ आंबेकर,भुसावळ तालुकाध्यक्ष भिका भाऊ बानाईत, जिल्हा संघटक रवी भाऊ अहीरकर, नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते , डॉ. प्रमोद भाऊ आंबोडकर, नशिराबाद शहर अध्यक्ष राजूभाऊ आमोदकर,अतुल गालफाडे, अमोल अंबिकार, गणेश गालफाडे , अक्षय टेमकर, चेतन चौधरी, बंटी गालफाडे, नरेंद्र निकम, मानस आमोदकर, दिगंबर आमोदकर, भूषण चौधरी, भादली येथील कार्यकर्ते , प्रमोद खंबायत चेतन कन्हैया वैभव खंबायत आनंदा खंबायत विनोद खंबायत साहेबराव खंबायत, विलास झारखंडे, उमेश खंबायत ज्ञानेश्वर आमोदकर ,संतोष सूर्यवंशी, विनोद खंबायत इ.समाज बांधव या वेळी उपस्थित होते.
भदली गावकरी यांच्या मध्यस्थीने नुकसान भरपाई व भविष्यात कुठल्याच समाज बांधवाला त्रास देणार नाही असा माफीनामा त्याच्या कडून लिहून घेण्यात आला व मनोजच्या भविष्याचा विचार करून त्याला सक्त ताकीत देण्यात आली.एकंदरीत घटनेची परिस्थिती बघून व स्थानिक नाभिक समाज बांधवांचा व त्यांच्या विचारांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. नाभिक बांधवाने दुकानाचे आर्थिक व मानसिक नुकसान होऊनही सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श गावकऱ्याचे चित्र उभे केले.
पोलीस स्टेशनला नाभिक समाजाची उपस्थिती बघून अन्यायाविरुद्ध जागरूक असणाऱ्या नाभिक समाजाचे पोलीस अधिकाऱ्यांनी याविषयी कौतुक केलं की, अशीच जर संघटनेची व समाजाची एकी असेल तर कसाही गुन्हेगार नमो हरण होतो, म्हणून समाज संघटने फार महत्त्वाच आहे. अखिल भारतीय जिवा सेना हि एक नाभिक संघटना असून समाजावर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही असे अखिल भारतीय जिवा सेनेचे प्रदेशाध्यक्ष देविदासभाऊ फुलपगारे यांनी सांगितले . तर समाजमाध्यमांवर हल्लेखोर तरुण दुकानावर दगड विटा मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नाभिक समाजात प्रचंड संताप व्यक्त होत आहे .
या संदर्भात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र (बंटी) नेरपगारे यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली.