CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जळगाव (प्रतिनिधी ) : यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उद्यानाला नियमित पाणीपुरवठा करता यावा व बागेची निगा राखून वृक्ष फुलझाडे यांची चांगली निगा व्हावी व प्रदूषण कमी व्हावे यासाठी .श्रीराम ठिबक सिंचन, श्री साईराम प्लास्टिक अँड इरिगेशनचे मालक श्रीराम पाटील यांनी ठिबक संच महाविद्यालयाला भेट दिला .
यावेळी प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे , इरिगेशनचे व्यवस्थापक संजय पुनतकर ,पंकज सपकाळे व योगेश महाजन ,उपप्राचार्य प्रा. ए .पी. पाटील, प्रा. एम.डी .खैरनार ,प्रा. संजय पाटील ,प्रा. मुकेश येवले आदी उपस्थित होते.