CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अहिराणी भाषेचं संवर्धन आणि संक्रमण काळाची गरज राज्यस्तरीय वेबिनार मध्ये वक्त्यांचा एक सूर

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

नाशिक ( कु.चेतना बोरसे) : उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंडळ आयोजित ५ दिवशीय राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनार मालिकेतील ४ थे पुष्प नुकतेच संपन्न झाले. अवघ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेती व विविध प्रकारचे पूरक व्यवसाय या संबंधी उत्तम मार्गर्शन व प्रेरणा मिळावी जेणे करून कोरोना सारख्या महासंकटावर मात करण्यास मदत होईल. मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पूर्णत्वास आलेलं हे वेबिनार तमाम शेतकरी बांधवांना वैचारिक खाद्य पुरवत आहे.

४ थ्या दिवशी मायबोलीवर प्रकाश टाकणारा विषय. अहिराणी भाषेचं संवर्धन आणि संक्रमण काळाची गरज या विषयावर अहिराणी भाषेचं प्रगल्भ ज्ञान,आपुलकी व तळमळ असलेले सन्मा.प्रा. सदाशिवराव सूर्यवंशी सर प्रमुख वक्ते म्हणून लाभले. तर धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील हे प्रमुखअतिथी म्हणून लाभले ( काही तांत्रिक अडचणींमुळे आमदार साहेब ऑनलाइन उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी मंडळाच्या या उपक्रमासाठी भरभरून दिलेल्या शुभेच्छा उत्साह वाढवतील )

अतिथींच्या ऑनलाईन आगमनाची सूचना विकास पाटील सरांनी दिली असता महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ . सुनिता बोरसे यांनी यजमानांचे शब्दसुमानांनी स्वागत करून मंडळाच्या कार्यकारिणीचा थोडक्यात परिचय करून दिला.पुढे वक्ते प्रा. सदाशिव सूर्यवंशी सर यांनी मुख्य विषयास प्रारंभ केला. अहिराणी भाषेविषयी बोलताना त्यांचा कमालीचा आत्मविश्वास, दृढ आदर, प्रेम, भाषेचं सखोल ज्ञान हे सगळं समस्त श्रोत्यांचं लक्ष केंद्रित करत होतं.

प्रा असले तरी कवी, गझलकार असा ज्यांचा पिंड आहे, असे सूर्यवंशी सर श्रोत्यांच्या मनाची पकड घेत होते. आपल्या मायबोलीविषयी अतोनात प्रेम झळकत असतानाच ,ती आपल्या पिढीपर्यंतच न थांबता येणाऱ्या अनेक पिढ्यांपर्यंत संक्रमित झाली पाहिजे त्या साठी आपण काय करायला हवे यावर भाष्य करतच त्यांनी अभिरांचा, अहिरांचा देश तसेच खांदेश नावाची उत्पत्ती..कान्हदेश, खांडव देश अशी कितीतरी उदाहरणे देत भारतावर अनेक आक्रमणे झालीत त्यातून भाषेचे संक्रमण झाले असा दाखला दिला.

ओघानेच खान्देशातील सण-वार, देवी- देवता, व्रत-उपवास, लग्न-समारंभ, सांस्कृतिक वारसा त्यात दडलेला भाषेचा गोडवा इ भरभरून वक्तव्य केलं.शेवटी सौ . सुनिता बोरसे यांनी आजचे प्रमुख वक्ते मा प्रा. सदाशिव सूर्यवंशी सर तसेच मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव व सर्व सभासद व अहिराणीवर प्रेम करणारे तमाम श्रोतेगण यांचे मनःपूर्वक आभार मानून आजच्या ४थ्या पुष्पाची सांगता केली.

सदर बेबीनार साठी मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील सर, उपाध्यक्ष प्रदीप अहिरे सर, उपाध्यक्ष आण्णासाहेब एल आर पाटील, उपाध्यक्ष नथु भामरे सर, सचिव दीपक पाटील,कोषाध्यक्ष आप्पासाहेब ए जी पाटील, कार्याध्यक्ष दिलीप सोनवणे सर,विनोद शेलकर सर, सरोदे सर, प्रा किशोर पाटील सर व सौ सुनिता बोरसे मॅडम इ मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.