CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
जामनेरः-२०२४ होणाऱ्या विधानसभा निवडाणुकीत ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. ओबीसी वर्गाने स्वतंत्र पुर्व काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनातील स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेकानी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याच शिवराय, फुले, आंबेडकर, शाहु यांच्या विचारानचे प्रेरीत असलेले राज्य मात्र निर्माण होऊ शकले नाही. याचा खेद महाराष्ट्रातील जनतेला आहे. यापुढील काळात महाराष्ट्रचा विकासासाठी व योग्य विचारासाठी महाराष्ट्रात ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, या माध्यमातून ओबीसीची ताकद महाराष्ट्रातील जनतेला कळेल असे आवाहान ओबीसीचे नेते तथा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले. जामनेर तालुका नाभिक समाज मंडळ, श्री. संत सेना महाराज बहुऊद्देशिय संस्था जामनेर व महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जळगाव जिल्हा नाभिक समाज मेळावा प्रसंगी ते बोलत होते.
याप्रंसगी व्यासपिठावर नाभिक महामंडळाचे राज्यध्यक्ष कल्याणराव दळे, कार्यध्यक्ष दामोदर काका बिडवे, महिला प्रदेश अध्यक्ष भारतीताई सोनवणे,जळगांव जिल्हाध्यक्ष रविद्र (बंटीभाऊ) नेरपगारे, कर्मचारी जिल्हाध्यक्ष मनोहर खोंडे, महिला जिल्हाध्यक्ष संगिता गवळी, भारतीताई राऊत, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, उमाकांत निकम, प्रशांत बाणाईत, चद्रकांत शिदे, सरचिटणिस रविद्र शिरसाठ, सहा. कार्यकारी अभियता एस.आर. राऊत, राज्य कार्यकारणी सदस्य सुनिल बोरसे, सुधाकर सनांसे, संजय पवार भडगांव, राजकुमार गवळी, रामभाऊ गागुर्डे एरोनडल,शशिकांत वारुळकर यावल,संजय बोरसे भुसावळ,सचिन सोनवणे,जगदीश वाघ एम आई डी सी, भिकनं बोरसे,प्रकाश निकम,भागवत सोनवणे,भैय्या वाघ पिंप्राळा,मधुकर सैदाणे अमळनेर,रघुनाथ खोंडे, विवेक वखरे बोदवड,संजय वाघ,संतोष कुवर्,रवींद्र सौदने चोपडा,न्याणेश्र्वर सोनवणे,शत्रुघ्न सोनवणे,संजय सोनवणे,किरण नेरपगार ४०गाव,नरेश गर्गे पाचोरा,येगेश चित्ते, सह सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
महामंडळाचे कार्यध्यक्ष दामोदर काका बिडवे म्हणाले की, नाभिक समाजातील जाती, पोट जातीच्या भिंती तोडुन सकल नाभिक समाज या छता खाली येऊन मुलामुलीचे विवाह जुळवुन आणा जेणे करुन तरुणाचे विवाह जुळवण्याचे समस्या चुटकी सरसी सुटेल असे सांगितले.
सुरवातीला श्री, संत सेना महाराज नाभिक समाज मंडळाच्या वतीने सेना महाराज मुर्ती मिरवणुक रथ यात्रा, अभिवादन सोहळा, वास्तु व मुर्ती पुजन, शुरविर जिवा महाले चौक नामकरण, संत सेना महाराज मंदिर लोकर्पण लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. साधना महाजन, उपनगराध्यक्ष प्रा. शरद पाटील, महेद्र बाविस्कर, अतिष झाल्टे, जितेंद्र पाटील सुहास पाटील, बंटी वाघ सह सन्माननीय नगरसेवक जामनेर यांच्या हस्ते करण्यात आले. करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा नाभिक युवा पदाधिकारी याची नियुक्ती करण्यात आली.यात पाचोरा तालुका अध्यक्ष पदी फकिरा शिरसाठ,तर युवक जिल्हा कार्याध्यक्ष पदी भैय्या वाघ पिंप्राळा,जिल्हा उपाध्यक्ष अभय सुर्यवंशी भुसावळ व इतर निवड करण्यात आली. मेळाव्यास जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव कार्यकारी सदस्य सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसंतराव साळुंके गुरुजी तर निकम सर यांनी सूत्रसंचालन केले व अनिल शिंदे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाध्यक्ष चद्रकांत शिदे, युवा जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे जामनेर तालुका उपाध्यक्ष तानाजी धांडे फत्तेपूर उपाध्यक्ष मधुकर वाघ श्री संत सेना बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वसंतराव साळुंके गुरुजी, शिवाजी शिंदे, राजेंद्र निकम, विजय राऊत, विनय खोंडे, शरद वासनकर, शिवाजी निकम, प्रवीण निकम, विश्वास पर्वते, श्रावण बोडरे, आत्माराम शिंदे, सुनील जाधव, वासुदेव शिंदे, जयंत पर्वते, कैलास वाघ, नाना पवार, जितेंद्र पावनकर गजानन पवार अनिल पवार प्रवीण निकम यश निकम अमोल शिंदे पारधी, शिवाजी राऊत शेंदुर्णी, रमेश धांडे फत्तेपूर, किशोर राऊत तोंडापूर, योगेश शिरसागर नेरी यांनी परीश्रम घेतले.