CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

नासिकमध्ये मृत्यूचं तांडव!,हृदय पिळवटून टाकणारी घटना !

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

नासिकमध्ये मृत्यूचं तांडव!,हृदय पिळवटून टाकणारी घटना !

नाशिक ( क्राईम बॉर्डर- सुनिता बोरसे ) : आज दुपारी नासिक मधील डॉ.झाकीर हुसेन(म .न. पा.) रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेचं दृश्य अत्यंत हृदयद्रावक! होतंझाकीर हुसेन रुग्णालयात जवळपास १२१ कोरोना रुग्ण उपचार घेत असून त्यातील १५० रुग्ण ऑक्सिजनवर होते.आज दु.१२.०० वाजेच्या सुमारास याच रुग्णालयात ऑक्सिजन टँकर मागवण्यात आला होता .मात्र दुर्दैवाने त्यात काही बिघाड असल्याने वायू गळती झाली. हॉस्पिटलच्या आवारात सर्वत्र ऑक्सिजन पासरतोय आणि रुग्ण मात्र याच ऑक्सिजन विना प्राण गमावतायेत असं भयानक दृश्य! होतं.

 

मृत्यूच्या या सापळ्यात सर्व रुग्ण अडकले,अन दुर्दैवाने त्यातील जवळ जवळ २२ रुग्ण दगावले ही अत्यंत दुःखद घटना आज नाभिक येथे घडली. ऑक्सिजन साठी अक्षरशः तडफडून रुग्णांचे प्राण गेलेत.

 

तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला असावा असा स्थानिक प्रशासनाचा अंदाज. याचे मूळ कारण मात्र अजून समजले नाही.प्रशासनाकडून योग्य तो तपास होईल असे अधिकाऱ्यांचे आश्वासन. कारण काहीही असावे, मृत्यूचे असे तांडव मात्र पुन्हा कधी ही अन कुठेही न दिसावे!झालेल्या प्रकारांमुळे सगळीकडे अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे.