CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जामनेर तालुक्यातील बेटावद बु।। येथे आज दि-१४/१०/२०२१ रोजी सकाळी ९ वा.उपसरपंच गोपाल कदम यांच्या नैतृत्वात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.बाबूराव पांडुरंग सुरवाडे यांची अवैध दारू घेऊन येणारी दुचाकी गावाबाहेर पकडण्यात आली.
बेटावद बु।। ता :जामनेर बाबूराव सुरवाडे यांच्या घरी जाऊन ती दारू कोणाची आहे हे विचारले असता ती माझीच दारू आहे अशी कबुली बाबुराव सुरवाडे यांनी दिली.पोलीस पाटील यांनी दारू विक्री परवाना मागितला असता बाबुराव सुरवाडे यांनी एकच बॉटल जवळ ठेवण्याचा परवाना दाखविला.
पोलीस पाटील तसेच सरपंच,उपसरपंच,ग्रा.प.सदस्य यांनी बाबुराव सुरवाडे यांची कान उघडणी केली.तसेच जामनेर पोलीस स्टेशनशी संपर्क साधून कारवाई करण्याची मागणी केली.काही वर्षांपूर्वी गावात दारूबंदी झालेली आहे.मात्र अनेक जण गावात अवैध रित्या दारू विक्री करीत आहेत.परिणामी तरुण व्यसनाधीनतेकडे वळत असून अनेक तरुणांनी स्वतःचा जीव गमावला आहे.अनेक वेळा समजावून देखील न ऐकल्याने ग्रामस्थांनी धडक कारवाई केली.यापुढे दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा दिला.यावेळी पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच,ग्रा.प.सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.