CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

बेटावद बु।। येथे शिवजयंती उत्साहात साजरी

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

क्राईम बॉर्डर (प्रतिनिधी):- जामनेर तालुक्यातील बेटावद बु।। येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार अर्पण करून उपसरपंच गोपाल कदम यांच्या हस्ते पूजन करण्यात आली. त्यानंतर ट्रॅक्टर मध्ये शिवरायांची प्रतिमा ठेवून तसेच जिवंत देखावा सादर करून गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग विशेष ठरला. महिलांनी भगव्या फेट्यां सह मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन डीजे च्या तालावर ठेका धरला.

घोडे ठरले विशेष आकर्षण: बेटावद बु.येथील शिवजयंती उत्सवात पहिल्यांदाच तीन घोडे सांगण्यात आले. हे घोडे या जयंतीचं विशेष आकर्षण ठरले. एका तरुणाने शिवराय साकारले तर दोन तरुणांनी मावळे साकारले. सरपंचांची अनुपस्थिती??? : दरवर्षी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच यांच्या हस्ते करुन मिरवणुकीला सुरुवात करण्यात येते. यावर्षी मात्र सरपंच पदी महिला आहेत. सरपंच अनुपस्थित असल्याने त्यांचे पतींशी संपर्क साधला असता कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नसल्याचं त्यांनी सांगितले.सरपंचाना निमंत्रण का नाही?.असा प्रश्न नागरिकांना पडला असून तर्क वितर्क लावले जात आहेत.