CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
जळगाव क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
कापुसवाडी ता. जामनेर :-जामनेर तालुक्यातील कापुसवाडी या गावातून जाणारा देऊळगाव गुजरी कापूसवाडी हा मुख्य रस्ता शेवटची घटका मोजत आहे. रस्त्याला मोठं मोठे खड्डे पडले असून रस्त्याने पायी चालतांना तसेच मोटारसायकल चालविताना अडचण निर्माण होत आहे. हा रस्ता इतका भयंकर झाला आहे की रस्त्यात खड्डे की खडयात रस्ते आहे हेच कळत नाही.खड्ड्यात पाणी साचून तसेच रस्त्यावर मोठया प्रमाणात चिखल साचत असल्यामुळे गावातील तसेच बाहेरील अनेक नागरिक पाय घसरून तसेच गाडी स्लिप होऊन अपघात होत आहेत.
अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.तरी सदरील विभागाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या रस्त्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.