CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क
जळगाव : डोंबिवली बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच ओबीसीचे नेते व महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष मा.कल्याणराव दळे यांचा आज दि. ३ ऑक्टोबर २०२१ पासून उत्तर महाराष्ट्र दौरा दि.३ ऑक्टोबर रोजी रविवार रोजी जळगांव जिल्ह्यातील बारा बलुतेदार समाजातील ग्राम पंचायत सदस्य,सरपंच यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम ठीक २ वाजता व.वा.वाचनालय येथे बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच ओबीसीचे नेते व महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष कल्याण रावजी दळे यांच्या नेतृत्वात व आमदार राजूमामा भोळे व महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या उपस्थितीत व बारा बलुतेदार यांचे राज्याचे प्रतिनिधी विभागाचे प्रतिनिधी व जिल्ह्याच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बारा बलुतेदार समाजाचे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य व सरपंच नगरसेवक महापालिका यांचा सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम व वा वाचनालय वातानुकूलित सभागृह स्टेशन रोड जळगाव येथे दुपारी २ दोन वाजता आयोजित केलेला आहे. बारा बलुतेदार सर्व समाज बांधव सर्व समाजातील प्रमुख पदाधिकारी यांनी कार्यक्रमास उपस्थिती राहावे असावे आवाहन करण्यात आले आहे . दि. दि.३ ऑक्टोबर रोजी सोमवार रोजी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष स्व.नानासाहेब शिरसाठ (भडगांव) यांच्या घरी द्वार दर्शन घेऊन श्री संत सेना महाराज मंदिरास भेट ठीक ९ वा.तसेच पुढे धुळे येथे १२ वाजता बैठक,पुढे उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक शकुंतला लों ,करवंद नाका शिरपूर येथे ५ वा.संपन्न होईल.
सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रवींद्र(बंटी) नेरपगारे जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र नाभिक महामंडळ. जळगांव जिल्हा ,प्रभाग समिती सदस्यम.न.पा. जळगांव.यांनी केले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -मुख्य संपादक राजेंद्र वखरे ९६१९६३००३५