CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
CRIME BORDER NEWS NETWORK
नंदुरबार : येथील स्वा.सै.श्री.गो.देसाई आदर्श मराठी व गुजराती विद्यामंदिरात नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्ते श्री.शैलेश जोशी(संघटन मंत्री,देवगिरी प्रांत शिक्षण संस्थान व प्रचारक,आर.एस.एस.नागपूर),प्रमुख अतिथी सौ.मुक्ता पाटील(मुख्याध्यापिका,सरस्वती विद्यामंदिर,डोंगरगाव),श्री.संदीप पाटील,श्री. निलेश गिरासे,कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मिनाक्षी भदाणे(मुख्याध्यापिका,आदर्श मराठी विद्यामंदिर,नंदुरबार),श्री.भद्रेश त्रिवेदी(मुख्याध्यापक,आदर्श गुजराती विद्यामंदिर,नंदुरबार),प्रा.डॉ.श्री.युवराज पाटील,श्री.हेमंत पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रास्ताविकेतून सौ.भदाणे यांनी मूलभूत गरजा या कालानुरूप बदलत असतात,त्यामुळे शिक्षण देखील तेवढ्याच उच्च पातळीवरचे मिळायला हवे असे प्रतिपादन केले. तसेच प्रमुख वक्ते श्री.जोशी यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणात कुठल्या गोष्टीत बदल अपेक्षीत आहेत यावर विस्तृत अशी चर्चा घडवून आणली.सोबतच गणित व मराठी विषय कसा कृतीयुक्त पद्धतीने विविध अनुभव देऊन शिकवता येईल हे शिक्षकांना सहभागी करून प्रात्यक्षिक करवून घेतले.बदलत्या शैक्षणिक धोरणाचा उद्देश मातृभाषेतून शिक्षण देणे,कृतीयुक्त शिक्षण देणे,भारताचा अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा शिक्षणातून जोडला जावा असे चर्चासत्रातून सांगितले.
कार्यक्रमप्रसंगी सूत्रसंचालन श्री.हरिष चौधरी यांनी केले,आभार श्री.तुषार सोनवणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालवाडी,गुजराती व मराठी विभागातील शिक्षकांनी सहकार्य केले.