CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाराष्ट्र नाभिक महामंडळ संलग्न जळगाव जिल्हा नाभिक कर्मचारी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM

No image available

जळगाव (क्राईम बॉर्डर प्रतिनिधी) : जळगाव शहरातील शानबाग सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळ सलग्न असलेल्या जळगाव जिल्हा कर्मचारी संघटनेची नव्याने मोट स्थापन करण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्याची नूतन कार्यकारणी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

विभागीय अध्यक्ष नाना भाऊ शिरसाठ नाभिक समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी ) नेरपगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्हा कर्मचारी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी ह.भ.प श्री. मनोहर खोंडे (सर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष पदी भडगांव येथील संजय पवार यांची निवड करण्यात येऊन कार्याध्यक्षपदी बोदवड येथील संजय वाघ (सर) ,तर संपर्कप्रमुख म्हणून किरण नेरपगार चाळीसगाव, सरचिटणीस विजय ठाकरे त्याचप्रमाणे जिल्हा प्रवक्ता म्हणून कुणाल गालफाडे भुसावळ ,तर प्रसिद्धी प्रमुख पदी राजेंद्र बहळकर धनराज बोरनारे रावेर, नारायण श्रीखंडे मुक्ताई नगर,देविदास बिरारी अमळनेर,चंद्रकांत निकम पारोळा, प्रा.रितेश महाले पाचोरा,नंदलाल वाघ चोपडा,डॉ.राजेंद्र साळुंखे यावल,केशव आहिरराव एरोंडोल,रोहिदास वाघ भडगांव,मंगेश पांडे, कमलाकर बनाईत भुसावळ यांच्या सह जिल्हा तालुका कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

नाशिक बोर्डावर संचालक पदी नियुक्त संजय वाघ चाळीसगांव, एल. आय. सी.मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त रवींद्र सैंदाणे चोपडा, डॉ.ईश्र्वर सोनगीरे p,h,d,मिळाल्या बद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शिवाजीराव बहाळकर, पृथ्वीराज सोनवणे, कुमारजी सिरामे,राजकुमार गवळी यांच्या सह जिल्हा भरातून कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोहर खोंडे यांनी तर सूत्र संचालन नरेश मुऱ्हेकर यांनी केले.

जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाजाला अभ्यासू व दूरदृष्टी कोन असलेले जिल्हाध्यक्ष रविंद्र (बंटी) पगारे यांच्या रूपाने मिळाल्याने ,नवउत्साह व प्रेरणा मिळत असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखवली.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे नवनिर्वाचित जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र (बंटी ) नेरपगारे यांनी सूत्र हाती घेताच संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाजा मध्ये असलेले शिक्षित-अशिक्षित तरुण-तरुणी तसेच समाजासाठी झटणाऱ्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन जळगाव जिल्ह्यातील समाज एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे . समाजाला खंबीर नेतृत्व मिळाल्याने नाभिक समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील असे बोलल्या जात आहे.