CRIME BORDER | 27 December 2025 | 06:39 PM
बेटावद बु।। ता.जामनेर (प्रतिनिधी) - येथे ग्रामपंचायत निवडणुकीत युवाशक्ती पॅनल व गावकरी पॅनल असे दोन पॅनल सामोरा समोर उभे ठाकले आहेत. गावकरी पॅनल च्या सदस्यांनी गणपती समोर नारळ वाहून प्रचाराचा शुभारंभ केला तर युवाशक्ती पॅनल च्या सदस्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून प्रचाराचा शुभारंभ केला.
दोन्ही पॅनल कडुन तगडे उमेदवार उभे असून कोण बाजी मारेल ? याबाबत मतदारांमध्ये साशंकता आहे.मतदानाला फक्त सहाच दिवस शिल्लक असून दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार होण्याची शक्यता आहे.